Friday, July 31, 2015

Tomatoes chutney

Tomato chutney recipe

Ingredients

10 small tomatoes/ 7 big tomatoes


1 onion


4 unpeeled garlic pods


1 cm cinnamon


1 cm ginger


1 cup fresh coconut


10 leaves of curry leaves


3 green chilies(as per liking)
Salt

Preparation


Saute all ingredients in 4 spoon of oil. Grind in mixie..add salt as per taste...do not add water..can refrigerate for 3-4 days


Sunday, July 26, 2015

खजूराचा रस्सा


साहित्य - पाव किलो बिया काढलेला खजूर, चार-पाच मिरच्या, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, थोडी चिंच, गूळ, मीठ, दाण्याचा कूट, कोथिंबीर, काजूचे तुकडे.

कृती - खजुराचे तुकडे करावेत. मिरच्या, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, काजूचे तुकडे मिक्‍सरमध्ये घालून त्याची पेस्ट करावी. कढईत साजूक तूप घालून गॅसवर ठेवावी. त्यात खजुराचे तुकडे परतून घ्यावेत. त्यात तयार पेस्ट घालावी. त्यामध्ये सहा वाट्या पाणी घालून चिंच, गूळ, मीठ, दाण्याचा कूट घालून उकळी आणावी. 

रताळ्याचे वडे


साहित्य:- 
४ ते ५ रताळ्यांचा कीस, 
शुद्ध तुप, 
तळण्यापुरते तेल, 
चिमुटभर मीठ, 
२ मोठी वाटी उपवासाच्या भाजाणीचे पीठ 
१ ते दिड वाटी साखर, 
१ चमचा काजु, बदाम, वेलची पावडर 

कृती 
पातेल्यात मंद आचेवर तुप गरम करुन त्यात रताळ्याच किस परतावा. थोडा शिजत आला की त्यात साखर, काजु, बदाम, वेलची पावडर टाकुन चांगले खरपुस भाजुन घ्यावे. थोड थंड झाल्यावर रताळ्याचा किस, चिमुटभर मीठ उपवासाच्या भाजणीच्या पिठात मिक्स करुन चांगले मळुन घ्यावे. त्याचे छोटे छोटे वडे थापुन ते तेलात तळुन घ्यावेत.
सुचना:- जर गोड आवडत नसतील तर त्यात, हिरवी मिरचीची पेस्ट पण घालुन करत येतील.

Shingada dhokala


साहित्य - दोन वाट्या शिंगाड्याचे पीठ, एक वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, दोन वाट्या ताक, मीठ, मिरची, आले, जिरे, खाण्याचा सोडा आणि थोडे तूप.
कृती - सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजत ठेवावे. दोन-तीन तासांनी त्यामध्ये चवीनुसार मीठ, वाटलेल्या मिरच्या, आले, जिरे सोडा घालून हाताने चांगले मळून घ्यावे. नंतर एका चपट्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात पीठ घालावे. कुकरमधून अर्धा तास वाफवून घ्यावे. जरा गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.

राजगिरा कचोरी


साहित्य : पाव किलो राजगिरा पीठ, ४ बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, जिरा, तिखट, मीठ.
चटणीसाठी : नारळ ,कोथिंबीर, हिरवी मिरची.

कृती: सर्वप्रथम बटाटे उकडुन घ्या. हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्या.
बटाटा सोलून, मिरची कोथिंबीर पेस्ट, शेंगदाणा कूट, मीठ, तिखट सर्व एकत्र करून त्यात राजगिरा पीठ मिसळावे. सर्व पदार्थ मिसळताना थोडे पाणी घेऊन घट्ट पीठ तयार करा. छोटे-छोटे गोळे करून कचोरीच्या आकाराचे हातावर थापून घ्या. उकळत्या तेलात खुसखुशीत तळून घ्या. चटणीसाठी ओला नारळ, कोथिंबीर, मिरची एकत्र बारीक वाटून गरमागरम खमंग कचोरी बरोबर सव्‍‌र्ह करा.

Cucumber cutlet


साहित्य : २५0 ग्रॅम काकडी, १00 ग्रॅम बटाटे, १00 ग्रॅम उपवासाची भाजणी, चवीनुसार मीठ, दाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, चवीपुरती साखर, लिंबाचा रस आणि  तळायला तूप किंवा तेल.

कृती : काकडी किसून घ्यावी, बटाटे उकडून सोलून कुस्करावे. काकडी आणि बटाटे एकत्र करून वर उल्लेख केलेलं सर्व साहित्य त्यात घालून ते चांगलं एकजीव करावं. नंतर या मिश्रणाचे लहान गोळे बनवून कटलेटस् बनवावे. ते डीप किंवा शॅलो फ्राय करावेत.

उपवासाची टिक्की

उपवासाची टिक्की
साहित्य
अळ्कुड्या,सुरण,रताळे,
शिंगाडा,वरी तांदूळ, तेल किसलेलं खोबरं,जिरं,
कापलेली मिरची,आल्याची पेस्टमीठ

कृती -

प्रथम सर्व कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात शिजवून घ्यावीत. नंतर ती सारी कुस्ककरून त्यात आल्याची पेस्ट व मीरपूड मिसळावे. त्यानंतर हळूहळू त्यात मिरची, खोबर, जिरं मिसळून त्याच्या लहान लहान टिक्की बनवाव्यात.
वरीच्या तांदूळामध्ये ही टिक्की घोळवून तेलामध्ये शॅलोफ्राय करावीत.

राजगिरा शिंगाड्याची साटोरी


साहित्य
केळी,गूळ,राजगिऱ्याच्या लाह्या,राजगिऱ्याचे पीठ,शिंगाड्याचे पीठ,ओले खोबरे,साजूक तूप
भिजवण्याची कृती
राजगिऱ्याचे व शिंगाड्याचे पीठ थंड पाण्यात भिजवावे.साटोऱ्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना थोडेसे तूप घालावे.
सारणाची कृती -
एका पॅनमध्ये गुळाचा पाक करून घ्यावा.केळ्याचे काप करून त्याच घालावेत.केळी शिजल्यानंतर त्यात राजगिऱ्याच्या लाह्या व ओले खोबरं मिसळावे.हे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये पसरवून ठेवावे.
साटोऱ्या तयार करण्याची कृती –
भिजवलेल्या कणकेची पारी करून त्यात सारण भरावे.
सारण भरलेल्या साटोऱ्या अलगद लाटून घ्याव्यात.
पॅनमध्ये तूप गरम करून सारोट्या शॅलोफ्राय कराव्यात.

शिंगड्याचा शिरा


साहित्य : एक वाटी शिंगड्याचे पीठ, दोन कप सायीसकट दूध, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप, दोन चमचे किसमिस व बदामाचे काप, अर्धा चमचा वेलदोडापूड.

कृती : साजूक तुपावर शिंगाड्याचे पीठ खमंग भाजून घ्यावे. त्यात दूध गाघून झाकण ठेवून एक वाफ आणावी. साखर घालून शिरा शिजवावा. वेलदोडापूड मिसळावी. वरून किसमिस व बदामाचे काप पसरावेत.

Ghavan

उपवासाचे घावन

साहित्य : १ वाटी वरी तांदूळ, एक वाटी साबुदाणे, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे किसलेला खोबरे, २ चमचे दाण्याचे कूट, १ चमचा जिरे, चवीपुरते मीठ, साजूक तूप
कृती : १) साबुदाणा व वरी तांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबूदाणा
व वरी तांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशा प्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
आपण नेहमीच्या घावण्याला जेवढे घट्ट भिजवितो तेवढेच घट्ट भिजवावे.
म्हणजे त्या अंदाजाने पाणी घालावे.
३) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरावे.
कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी
बाजू नीट होऊ ध्यावी. गरम गरम घावण खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
टीप : १) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते. व उलथायला पण त्रास होतो. पहिला घावन चिकट झाला तर बाकीचे घावन वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू नीट भाजून घ्यावेत. 
२) घावण्यात थोडीसी चिरलेली कोथिंबीर पण छान लागते.
३) मिरची आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरावी.