साहित्य : २५0 ग्रॅम काकडी, १00 ग्रॅम बटाटे, १00 ग्रॅम उपवासाची भाजणी, चवीनुसार मीठ, दाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, चवीपुरती साखर, लिंबाचा रस आणि तळायला तूप किंवा तेल.
कृती : काकडी किसून घ्यावी, बटाटे उकडून सोलून कुस्करावे. काकडी आणि बटाटे एकत्र करून वर उल्लेख केलेलं सर्व साहित्य त्यात घालून ते चांगलं एकजीव करावं. नंतर या मिश्रणाचे लहान गोळे बनवून कटलेटस् बनवावे. ते डीप किंवा शॅलो फ्राय करावेत.
No comments:
Post a Comment