उपवासाचे घावन
साहित्य : १ वाटी वरी तांदूळ, एक वाटी साबुदाणे, २ हिरव्या मिरच्या, दोन चमचे किसलेला खोबरे, २ चमचे दाण्याचे कूट, १ चमचा जिरे, चवीपुरते मीठ, साजूक तूप
कृती : १) साबुदाणा व वरी तांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबूदाणा
व वरी तांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशा प्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
आपण नेहमीच्या घावण्याला जेवढे घट्ट भिजवितो तेवढेच घट्ट भिजवावे.
म्हणजे त्या अंदाजाने पाणी घालावे.
३) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरावे.
कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी
बाजू नीट होऊ ध्यावी. गरम गरम घावण खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
टीप : १) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते. व उलथायला पण त्रास होतो. पहिला घावन चिकट झाला तर बाकीचे घावन वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू नीट भाजून घ्यावेत.
२) घावण्यात थोडीसी चिरलेली कोथिंबीर पण छान लागते.
३) मिरची आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरावी.
No comments:
Post a Comment