साबुदाणा भजी
जिन्नस
१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल
कृती
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.
उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.
No comments:
Post a Comment