Sunday, July 26, 2015

उपवासाची खांडवी


साहित्य - दोन वाट्या वरईचे तांदूळ, तीन वाट्या गूळ, एक वाटी नारळाचा चव, छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर मीठ, चिमूटभर केशर, अर्धी वाटी तूप. 
सजावटीसाठी - काजू, बदाम, चारोळ्या.
कृती - प्रथम वरईचे तांदूळ कोरडेच चांगले भाजून घ्यावेत. मग स्वच्छ धुऊन घ्यावे. तूप गरम करून त्यात ते घालून आले, नारळाचा चव वाटून घालून शिजायला ठेवावी. शिजवताना त्यात चिमूटभर मीठ, वेलदोडा पूड, केशर भाजून व कुटून घालावे. वरईचे तांदूळ शिजल्यावर ते परातीत मोकळे करून पसरवून ठेवावेत. गुळाचा पाक करून त्यात एक चमचा तूप घालावे. त्यात मोकळे केलेले वरईचे तांदूळ घालून ते परतून घ्यावे. घट्ट झाले की त्याला तूप लावून त्यावर तो गोळा घालून थापावा. जाड वड्या पाडाव्यात. शक्‍य असेल तर सजावटीसाठी काजू, चारोळ्या, बदामाचे काप लावून सजवाव्यात. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यावर थापल्या तरी छान दिसतात आणि लागतातही चवदार.

No comments:

Post a Comment